Think of a Dharmic Vidhi, Think of oPandit!

PitruPaksha, Pind Daan, Mahalay Shraaddha, Ancestors, Tarpan​, 14th Sep, 2019

होय होय, अनंत चतुर्दशी झाली... होय तोच काळ सुरू होतोय... वर्षानुवर्षे उगाचच अशुभ-अशुभ म्हणून हिणवला गेलेला... पितृपक्ष...पक्ष म्हणजे 15 दिवस, पितृ किंवा पितर म्हणजे ढोबळमानाने आपले देवाघरी गेलेले नातेवाईक...

का करावे? कोणी करावे? कसे करावे? कोणाचे करावे? कुठे करावे? असंख्य प्रश्न... पण एक सोप्पे सुटसुटीत उत्तर - "कुठल्याही प्रकारे करावे पण नक्की नक्की करावे"...

#का_करावे? - उत्तम संतती व संपत्ती ह्याची अपेक्षा असेल तर श्राद्ध न चुकता करावे... आपल्या घरी अपमृत्यु, दुर्मरण येऊ नये असे वाटत असेल तर श्राद्ध चुकवू नये... आपला वंश खंडित होऊ नये असे वाटत असेल तर सश्रद्ध व समंत्रक श्राद्ध विधी करावेत (वंश खंडित न होणे म्हणजे त्या योगे जपून ठेवलेल्या family values व संस्कार खंडित न होणे)...

#कोणी_करावे? - अगदी घरातल्या कोणीही...

#कुठे_करावे? - आपल्या घरी

#केव्हा_करावे? - खरंतर अगदी 15 दिवस रोज पक्ष श्राद्ध करायला सांगितली आहेत. पण आजकाल लोकांना 15 दिवस सलग रोजची अंघोळ व स्वयंपाक घरी करतो ह्यातच धन्यता वाटावी असे दिवस आल्याने, रोज श्राद्ध हे आपल्या कल्पनाशक्ती च्या पलिकडचेच आहे  :)  :) ...
मग काय नियम केला? सोप्पे आहे... घरातील जो latest पिढीतील पुरुष स्वर्गवासी झालेला आहे त्यांची तिथी काढावी. उदाहरणार्थ, माझे वडील "श्रावण कृष्ण पंचमीला" गेलेले असतील तर पितृपक्षातील पंचमीला श्राद्ध करावे... Map पंचमी to the पंचमी in पितृपक्ष... शक्य नाही? अष्टमीला किंवा एकादशीला करावे... अ हं, तेव्हापण शक्य नाही? सर्वपित्री अमावास्येला करावे... "अगं मृदुल, आम्ही 15 दिवस out of India आहोत गं... नाहीतर नक्की केले असते...
"अहो काकू काळजी नको, महालय आरंभ पितृपक्षाने होतो पण महालय समाप्ती हा जवळपास 2 महिन्यांचा काळ आहे, 2 महिन्यात एक दिवस 40 मिनिटे तरी काढू शकाल ना काकू?..."
"काय सांगतेस? हे तर आम्हाला माहीतच नव्हते... This is really waw!"
"Thanks  :) ... लिहून घ्या पाहू पट्कन, 14 सप्टेंबर,2019 ते 16 नोव्हेंबर,2019 च्या कालावधीत उत्तम प्रकारे, पितरांना तृप्त करण्यासाठी आपण श्राद्ध करू शकतो"...

कुठल्याही इतर देवतेला न दिलेला (गणपती फक्त 10 दिवस, नवरात्र 9 दिवस), 15 दिवसांचा पूर्ण कालावधी व पुढे 2 महिन्यांपर्यंत असा काळ फक्त आणि फक्त आपल्या पितरांसाठी... म्हणजे श्राद्ध करणे किती महत्त्वाचे आहे? आपण आपलाच विचार करावा...

#कोणाचे_करावे - आपले देवाघरी गेलेले सर्व नातेवाईक, आपले गुरू, आपले आप्त, आपले सासू सासरे, आपल्या आईचे आईवडील... अशी आपल्या बुद्धीला झेपणारी नाती...
श्राद्ध मंत्र पाहिलेत तर अगदी आपल्याला बाळ असताना ज्या बाईंनी मालिश केली ते अगदी आपल्या गॅलरी मधले छोटेसे तुळशीचे रोपटे, ते आपल्या कडे असलेली आपली मनीमाऊ ते आपल्याकडे अनेक वर्षे पोळ्या करायला यायच्या त्या आजी ते आपण ज्यांच्याकडे नोकरी करतो, ज्यांच्यामुळे आपले घर चालते ते आपले मालक, सर्वांना प्रेमाने अन्न भरवले आहे...
ते जिथे असतील, ज्या योनीत असतील त्यांना तेथे अन्न पोहोचेल अशी मंत्राद्वारा व्यवस्था केलेली आहे...

#कसे_करावे? चटावरचे श्राद्ध, स-पिंडक श्राद्ध with or without प्रत्यक्ष ब्राह्मण भोजन

खालील case scenarios म्हणजे
श्राद्ध नाही

1) आम्ही गरिबांना खाऊ घालतो - असे करूयात, तुम्ही खूप भुकेले आहात, मी तुमचे स्वागत करते, तुम्हाला आसनावर बसवते आणि सुंदर स्वयंपाक करून तुमच्यासमोर 10 गरिबांना खायला घालते. माझी अशी अपेक्षा आहे की तुमचे पोट भरले...

2) आम्ही पैशाने अनाथआश्रमाला मदत करतो - असे करूयात, तुम्ही खूप भुकेले आहात, मी तुमचे स्वागत करते, तुम्हाला सोफ्यावर बसवते, ताट भरून 50 रुपयांच्या नोटा, नाणी, सोन्याची नाणी तुमच्या समोर आणून ठेवते आणि सांगते पोटभर जेवा हं!!!

3) आम्ही गुरुजींना बोलावत नाही - मंत्र म्हणल्याशिवाय दिलेले अन्न पितरांना पोहोचत नाही. गुरुजींना काही हजार दक्षिणा देताना एवढी कालवाकालव पोटात होत असेल तर हिमत दाखवावी, स्वतः जाऊन वेद पाठशाळेतून मंत्र शिकून श्राद्ध विधी करावेत...
एक ध्यानात घ्यावे, घरी जेव्हा सत्पात्र ब्राम्हण प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन जातो त्या घरात सतत लक्ष्मी चा वास असतो, असा आशीर्वाद रुक्मिणी देवींनी दिलेला आहे...

ह्या पक्ष श्राद्धाबरोबरच अविधवा नवमी (सर्व स्त्रिया ज्या सवाष्ण गेल्या आहेत व त्यांचे पती अजून हयात आहेत त्यांचे श्राद्ध) ,भरणी श्राद्ध - अशा सर्व व्यक्तींचे श्राद्ध ज्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालेले नाही अशी 2 श्राद्ध काही कुटुंबामध्ये करायची असतात...

फार मोठा विषय आहे, अतिशय महत्त्वाचा, आपल्या धर्माचा अविभाज्य भाग म्हणजे श्राद्धकर्म... एक फार मोठी अदृश्य शक्ती जिच्यात देवतांना आपल्यासाठी बोलवून आणण्याचे सामर्थ्य आहे...पण त्यांना ऊर्जा मिळाली, सद्गती मिळाली तरच ते आपल्यासाठी काहीतरी करू शकतील... आपण देवाला प्रेमाने अर्पण केलेल्या गोष्टी ह्या पितृलोकांच्या मार्फत, त्यांच्याकडून देवांना पोहोचतात व त्यांचे आशीर्वाद पितरांकडून आपल्यापर्यंत... आपल्याला देवाने दिलेल्या संपत्तीची किल्ली पितरांकडे आहे...
आपले आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करणे जितके महत्त्वाचे तितकेच महत्त्वाचे ते गेल्यानंतर त्यांच्या सद्गतीसाठी श्राद्ध करत रहाणे आहे...
ज्या घरी श्राद्ध विधीचा लोप होऊ लागतो त्यांच्या साधारण तिसऱ्या पिढीपासून प्रखर पितृदोष जाणवायला लागतो असे शास्त्रकारांचे मत आहे... हळूहळू संपत्ती (assets) कमी होऊ लागते, घर अशांत होऊ लागते...

देवकृपेने, पितृकृपेने आपल्याकडे समृद्धी आहे, त्यांचे ऋण मनापासून फेडूयात... ह्या काळात आपले आई वडील, आजी आजोबा आपल्या खूप जवळ असतात, आपल्या आसपास असतात... त्यांनाही उत्तम जेवू घालून तृप्त करूयात...

शुभं भवतु |

---- मृदुला बर्वे, ओपंडित

Reference book: श्राद्ध एक विचार आणि कृती - लेखक: प्रभाकर पाध्ये गुरुजी